बीड राजकारण

तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये’ असे म्हणत धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक साद

भाजप नेत्या आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते पंकजा मुंडेंचे चुलत बंधु धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सर्वांनाच माहिती आहे. बीडच्या राजकारणात या दोघांचेही महत्त्वाचे स्थान आहे. या दोघांमध्ये नेहमीच वाद-विवाद सुरू असतात. मात्र पंकजा मुंडे या आजारी असल्याचे कळताच धनंजय मुंडे यांनी त्यांना भावनिक साद घातली आहे. तसेच मोठा भाऊ म्हणून मी सोबत असल्याचेही ते म्हणाले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकतीच पदवीधर विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या ऐन एकदिवस आधी, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक खराब झाली. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, ‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे, त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी’

पंकजा मुंडे या आजारी आहेत हे कळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना भावनिक साद घातली आहे तसेच काळजी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ‘पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!