बीड क्राईम परळी

पत्नीने विष घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच पतीनेही घेतले गळफास


बीड -पत्नीने विष घेत आत्महत्या केल्याचे लक्षात येताच पतीने देखील गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळीत घडल्याने खळबळ उडाली आहे. पती पत्नीने अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
परळी तालुक्यातील पांगरी कॅम्प इथली ही घटना आहे. इथे पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली. प्रियंका पंडित आणि सायस पंडित अशी आत्महत्या करणाऱ्या जोडप्यांची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने विष घेऊन तर पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.
स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर दोघांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!