बीड

बिबट्या करमळ्यात पोहचला, हल्ल्यात दारे धारणारा तरुण ठार

बीड, फुंदेवडी (ता.करमाळा) येथील दारे धरत असलेल्या 40 वर्षीय कल्याण देवीदास फुंदे या युवकावर बिबट्याने आज सायंकाळी हल्ला केला ज्यामध्ये फुंदे यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरुन असे वाटते की,हा तोच बिबट्या आहे ज्याने आष्टी तालुक्यातील नागनाथ गर्जे,स्वराज भापकर,सुरेखा बळे यांच्यावर हल्ला करुन त्यांचा जीव घेतलेला आहे.त्यामुळे आष्टीकरांनी नरभक्षक बिबट्यापासून एकप्रकारे सुटकेचा निश्वास सोडला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही माञ आता सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाचे आव्हान वाढले असून त्यावर तात्काळ नियंञण आणणे गरजेचे आहे. या घटनेनंतर आ. सुरेश धस यांनी संपूर्ण प्रशासन अलर्ट केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!