करिअर

MPSC कडून नवीन वेळापत्रक जाहीर 

​लोकाशा न्यूज : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून नव्याने वेळापत्रक आज (ता.०९)  जाहीर करण्यात आले. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०,  दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० या तिन्ही परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

MPSC राज्यसेवा पूर्व २०२० – 20 सप्टेंबर २०२०
MPSC गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा -२०२०
 – 11 ऑक्टोबर २०२०

​​​ नवीन वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा २२ नोव्हेंबरला होईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार आहे. तत्पूर्वी, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला होता. 

आयोगाकडून यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा करोना संसर्गाच्या व लॉकडाउनच्या ऐनवेळी पुढे ढकलण्यात येऊन परीक्षांचे सुधारित दिनांक संदर्भिय प्रसिद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!