करिअर

MHT-CET 2020 : सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना मुदतवाढ

मुंबई : सीईटी परीक्षा 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी 2020 – 2021 च्या ऑनलाईन सीईटी परीक्षांकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.
सीईटी सेलमार्फत विविध 12 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असणार असल्याचे सीईटी सेलमार्फत सांगण्यात आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!