बीड

अखेर अनुकंपाधारकांची पावणेदोनशे उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द, येत्या 15 सप्टेंबर अनेकांना नियुक्ती मिळण्याची शक्यता


बीड : अनुकंपाधारकांच्या नेमणुकीचा विषय कोरोनाच्या विळख्यातून बाहेर निघाला आहे. आता जिल्हा परिषदेतही याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. 175 उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व ज्येष्ठता यानुसार प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावरील आक्षेप मागविले आहेत. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत सव्वाशेवर उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नव्या आदेशातून अनुकंपाधारकांच्या नेमणूकीला शासनाने सूट आणि भरतीयोग्य पदांच्या प्रमाणात 20 टक्क्यांऐवजी एकूण रिक्त पदांच्या 20 टक्के पदांवर नेमणूकीच्या निर्णयामुळे आणखी 80 उमेदवारांना फायदा होणार आहे. त्यामुळे 55 आणि 80 अशा 135 पदांवर नेमणूकीची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत नऊशेवर रिक्त जागा आहेत. जिल्हा परिषदेने अनुकंपा उमेदवारांच्या नेमणूकीसाठी विविध विभागांकडून माहिती मागविली आहे. तसेच उमेदवारांची प्रतीक्षा यादीही प्रसिध्द केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे यांनी सांगितले. शैक्षणिक अर्हता व रिक्त पदे याचा ताळमेळ लावून ही प्रक्रिया केली जाणार आहे.

उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये – अजित कुंभार
अनुकंपाधारक उमेदवारांची भरती शासन नियमाने व पुर्णत: पारदर्शक होईल. उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रणदेखील केले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!