बीड

भाजप नेते सलीमभाई जहाँगिर यांना पितृशोक, निवृत्त मंडळ अधिकारी हाजी शेख जहाँगिर यांचे निधन


बीड : येथील भाजपा नेते सलीमभाई जहाँगीर यांचे वडील निवृत्त मंडळ अधिकारी हाजी शेख जहाँगिर यांचे शुक्रवारी पहाटे गजानन नगर येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 68 वर्षे होते, शासकिय कर्मचारी महासंघात तलाठी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महसूल प्रशासनात त्यांच्या कार्याचा मोठा दबदबा होता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना 2009 च्या लोकसभा निवडणूकीच्या अडचणीच्या काळात त्यांनी मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या अशा अचाणक जाण्याने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता शहीशावली दर्गा परिसरात दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सलीम, अलिम, कलिम अशी तीन मुलं, दोन भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जहाँगिर कुटूंबियांच्या दुख:त दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!