बीड

स्वॉब देण्यास टाळाटाळ केली तर थेट गुन्हा दाखल होणार

कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा- सीईओ अजित कुंभारबीड : सर्वांच्या एकीतूनच कोरोनाला आपल्याला हरविता येणार आहे. त्यामुळे कोरोना बाधितांच्या सहवासात आलेल्यांनी स्वॉब देण्यास टाळाटाळ करू नये, स्वॉब देण्यास टाळाटाळ केली तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात कोवीड 19 चा प्रादुर्भाव वाढत असून याचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक उपययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे बाधित रूग्णांच्या सहवासितांचा शोध घेवून त्यांचे विलगीकरण करणे व आवश्यकतेनुसार कोविड 19 ची चाचणी करणे हा आहे. बाधित रूग्णाची विचारपुस व चौकशी करून त्या आधारे अशा सहवासीतांची यादी बनवून अतिजोखमीच्या सहवासीत व्यक्तीची स्वॅब तपासणी करण्यासाठी त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत संपर्क केला जातो, कोवीड 19 चा प्रसाराची साखळी तोडायची असेल तर हे अत्यावश्यक आहे. मात्र प्रशासनास असे निदर्शनास आले आहे की, अतिजोखमीच्या व्यक्तींना संपर्क करून कोविड केअर सेंटर येथे स्वॉब तपासणीसाठी वेळ आणि दिनांक निश्‍चित केला जातो. परंतू संबंधित व्यक्ती विविध कारणे देवून कोविड 19 चाचणीत अडथळा आणतात. किंवा भ्रमणध्वनी बंद करून ठेवतात, कर्मचार्‍यांशी उध्दटपणे व अर्वाच्च भाषेत सुध्दा बोलतात, तसेच प्रशासनाची दिशाभुल करून स्वॉब तपासण्यत टाळाटाळ करतात. सहवासीतांनी यापुढे कोणत्याही कारणास्तव स्वॉब देण्यास टाळाटाळ करून नये, दिलेल्या वेळेत स्वॉब देण्यास हजर राहून प्रशसनास सहकार्य करावे, तपासणीत टाळाटाळ अथवा नकार दिल्यास तात्काळ संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!