बीड

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार, पंकजाताई मुंडे विकासाचे व्हिजन असलेल्या सुसंस्कृत उमेदवार ; मतदारच देत आहेत विजयाची ग्वाही

माजलगाव । दि. २१ । भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी माजलगाव शहरातील मतदारांच्या डोअर टू डोअर भेटी घेतल्या. राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्या काळात झालेली विविध विकास कामे नागरिकांचे जीवनमान उंचावणारे असल्यामुळे पंकजाताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असलेल्या, सुसंस्कृत उमेदवार आहेत, ज्यांनी विकास केला आहे आणि करण्याची क्षमता आहे अशा उमेदवार म्हणून आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आहोत, त्यांचा विजय निश्चित आहे अशा भावना या दौऱ्यादरम्यान मतदारांनी व्यक्त केल्या.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खा. प्रितमताई मुंडे यांनी माजलगाव शहरातील मतदारांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला. शहरातील सुरेश भानप, लक्ष्मीकांत मुंदडा, ओंकार खुरपे, ॲड.विश्वास जोशी प्रा. मगर,ॲड. लवटे, अच्युतराव लाटे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या. तसेच श्री मंगलनाथ मंदिर, जुना मोंढा येथे आयोजित अध्यात्मिक सोहळ्यांना उपस्थित राहून भाविकांशी संवाद साधला. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या विविध हेड अंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी अभूतपूर्व विकासनिधी मंजूर करून आणला होता. त्यांच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामांची प्रक्रिया यापूढेही निरंतर सुरु ठेवण्यासाठी पुन्हा एकदा पंकजाताईंना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दया आणि त्यांच्या पाठीशी मतदानरुपी आशीर्वाद उभे करा’ असे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी मतदारांना केले.

भाजप नेते रमेश आडसकर, अरुण राऊत,तुकाराम येवले, राहुल जगताप,डॉ. अशोक तिडके, सुरेश दळवी,दीपक मुंडे, शरद यादव,ईश्वर खुरपे, सुशांत जाधवर,दत्ता महाजन यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते यादरम्यान उपस्थित होते.

विश्वकर्मा संघटना पंकजाताई मुंडे यांच्यासोबत

माजलगाव तालुक्यातील विश्वकर्मा संघटनेची खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. पंकजाताई मुंडे या अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणाऱ्या, सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामील करणाऱ्या नेत्या आहेत. माजलगाव तालुक्यातील विश्वकर्मा संघटना  सर्वसमावेशक उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या सोबत असून त्यांना अभूतपूर्व मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी खा. प्रितमताई मुंडे यांच्या समक्ष दिली. तत्पूर्वी खा. मुंडे यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या मंदिरात दर्शन घेतले

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!