मनोरंजन क्राईम

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ!चौकशीदरम्यान क्राईम ब्रांचने केला प्रश्‍नांचा भडीमार

मुंबई 24 जुलै: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. त्यामुळे कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी सात दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान राजला आणखी एक धक्का देण्यात आला. त्याची पत्नी शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली. या वेळी राज आणि शिल्पा यांना समोरासमोर बसवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीला हे 10 प्रश्न विचारण्यात आले होते.

  • वियान कंपनी खूप चांगली कमाई करत होती. शेअर मार्केटमध्ये तिचा भाव वाधारला होता तरी देखील कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला?
  • वियान आणि कॅमरिन या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
  • पोर्न व्हिडीओ लंडनला पाठवण्यासाठी वियान कंपनीच्या ऑफिसचा वापर केला जात होता. याबद्दल तुम्हाला माहिती होती का?
  • हॉटशॉट या अॅपबद्दल काही माहिती आहे?
  • हॉटशॉटवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओंविषयी काही माहिती आहे का?
  • हॉटशॉटच्या व्यवहारांत तुम्ही देखील सामिल आहात का?
  • प्रदीप बक्क्षीसोबत हॉटशॉटबद्दल कधी चर्चा केली का?
  • पोलिसांच्या हाती लागलेल्या ईमेल आणि वॉट्स अॅप चॅटबद्दल काही माहिती आहे का?
  • राज कुंद्राच्या व्यवसायाविषयी काही माहिती आहे का? तो नेमका काय व्यवसाय करतो?
  • राज कुंद्रा आपल्या आर्थिक व्यवहाराबद्दल तुम्हाला काही माहिती देतो का?

राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या (Hotshot) कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच (Crime branch) कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे. दरम्यान अशाच काही ग्रुप्स ची माहिती न्यूज 18 च्या हाती लागली आहे. ज्यादिवशी शुट केलं जायचं त्यादिवशी नवा ग्रुप बनवला जाई व आर्टिस्ट न्यूड असं नाव दिलं जाई. फेब्रुवारी महिन्यात हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.
याशिवाय पोलीस कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकतात याचा अंदाज देखील राज कुंद्राला होता. त्यामुळे पोलिसांनी ऑफिसवर धाड टाकण्याआधीच जवळपास 2TB डेटा हा डिलीट करण्यात आला होता. क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार अद्याप पोलिसांनी 100 हून अधिक अश्लील चित्रफीती त्यांनी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सुरू असून राज कुंद्राची पोलीस कोठडी आता 29 जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!