महाराष्ट्र

पायाला फोड आले असतानाही मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला हे विसरून चालणार नाही, पंकजाताई गहीवरल्या

मुंबई: नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजाताई मुंडे यांनी या चर्चेला पत्रकार परिषद घेत पूर्णविराम दिला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना पंकजा मुंडे गहिवरल्या (Pankaja Munde Emotional) असल्याचं दिसून आलं. पंकजाताई मुंडे यांना यावेळी गोपीनाथ मुंडे यांची देखील आठवण झाली. (Pankaja Munde emotional during press conference with memory of Gopinath Munde)

प्रीतमताई लोकसभेला निवडून आल्या. मला वाटत मुंडे साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता, माझ्या पायाला फोड आले होते, मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला, असं सांगत असताना पंकजाताई मुंडे भावूक झाल्याचं दिसून आलं. प्रीतमताई निवडणुकीला ज्या उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर उभ्या राहिल्या. त्यामुळे त्या रेकॉर्डब्रेक करणार होत्या. पण आता जी निवडणूक त्या जिंकल्या त्या त्यांच्या मेरीटवर जिंकल्या. तरीही ती प्रीतमताई निवडणुकीच्या उमेदवार राहणार नाहीत, अशा चर्चा होत्या. आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठी केलेत. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठी आहे ती वेगळी आहे, असं कोणी म्हणत असेल तर मी मात्र तसं म्हणणार नाही. पक्षामध्ये जे अ‌ॅडिशन झालं त्यामुळे एक जर मत वाढलं तरी ते समाधानाची बाब आहे, असं पंकजाताई मुंडे हे सर्व सांगत असताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं भावूक झाल्या होत्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!