बीड

गावच्या वस्तांवरील पाणी टंचाईचा प्रश्‍न मिटणार, आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नातून बीड तालुक्यात 68 ठिकाणी घेतले जाणार बोअर , पाली येथून बोअर घेण्याच्या कामास सुरूवात

गावच्या वस्तांवरील पाणी टंचाईचा प्रश्‍न मिटणार,
आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नातून बीड
तालुक्यात 68 ठिकाणी घेतले जाणार बोअर
पाली येथून बोअर घेण्याच्या कामास सुरूवात
बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड तालुक्यातील 68 गावांमध्ये नवीन विंधन विहिर (बोअर) घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाली येथून या कामाचा शुभारंभ आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम व गावातील ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आला. यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या 68 गावांमध्ये नवीन बोअर घेण्याच्या कामामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मिटणार असल्याने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले जात आहे.
बीड तालुक्यात आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून अनेक विकास प्रश्न मार्गी लागत आहेत. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून कुटेवाडी येथील धनगरवस्ती, गायकवाडवस्ती, वरवटी येथील गुजरवस्ती, पाली येथील फुलेनगर, इस्लाम मदरा, चाळकवस्ती, भालदरा राऊतवस्ती, नवलेवस्ती, भोसलेवस्ती, जोगदंडवाडी, कारगुडेवस्ती, मुर्शदपुर येथील जगतापवस्ती, नाळवंडी येथे म्हेत्रेवस्ती, अमराईवस्ती, चौसाळा येथील हनुमान मंदिर, गावठाण, सुलतानपुर रोड, औताडेवस्ती, हिंगणी बु.येथील ज्योतीबा मंदिर, तांदळेवस्ती, मुंडेवस्ती, जेबापिंप्री येथील जि.प.शाळा, गावठाण, कोकाटेवस्ती व इतर एक ठिकाणी तसेच उमरद जहाँगीर येथील भिल्ली वस्ती, आहेरवस्ती, खापरपांगरी येथील शेंडगेवस्ती, पारगाव शिरस येथील गव्हाणेवस्ती, जमदाडेवस्ती, रूद्रापुर येथील आघाववस्ती, सौंदाणा येथील गायकेवस्ती, सावंतवस्ती, पारेखवस्ती, काटवटवाडी येथील पारखेवस्ती, केकतवस्ती, गावठाण, बहिरवाडी येथील रामतिर्थ, खांडेपारगाव येथील राऊतवस्ती, पाटीलवस्ती, दलितवस्ती, बोरफडी येथील कुटेवस्ती, नवगण राजुरी येथील बहिरवस्ती, बाकरवस्ती, तांदळ्याचीवाडी येथील तांदळेवस्ती, सानपवस्ती, भरडवस्ती, धावज्याचीवाडी येथील सांगळेवस्ती, डोईफोडवाडी येथील डोईफोडवस्ती, बेलुरा येथील जामपीरवस्ती, चर्हाटा येथील स्मशानभूमी, उबाळेवस्ती, वंजारवाडी येथील तांदळेवस्ती, जगदंबनगर, लिंबारूई देवी येथील गावठाण, नांदेवस्ती, पिंपळनेर येथील गोपाळवस्ती, वाणीवस्ती, सानपवाडी येथील सानपवस्ती, सोनपेठवाडी मंदिराजवळ, सुर्डीथोट येथील स्मशानभूमी, गोपाळवस्ती, बोरदेवी येथील सांगळेवस्ती, तांगडेवस्ती, भांगेवस्ती, बेडकुचीवाडी येथील पवारवस्ती, शहाजानपूर येथील दलितवस्ती, शाहजानपूर येथील मतेवस्ती, नाथापुर येथील वडारवस्ती, बाजारवस्ती, चौसाळा येथे अंगणवाडीसमोर अशा 68 गावांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!