राजकारण महाराष्ट्र

‘माझी निव्वळ बदनामी करण्याच्या हेतूने षडयंत्र’; दुसर्‍या पत्नी करूणा शर्माच्या आरोपानंतर धनजंय मुंडेंनी दिले स्पष्टीकरण

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्‍या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या दुसरी पत्नी करुणा मुंडे (शर्मा) यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडे विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीत गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. काही मराठी वृत्ताहिनीच्या वृत्तानूसार, करुणा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे या आरोपाबाबत म्हणाले की, करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पुर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्यन्यायालयातयाचिका दाखल केली असुन त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत उच्य न्यायालयाने करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्य न्यायालयाने, मद्रास उच्चन्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

​सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असुन दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादांसह इतर सर्व सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत. असे असताना आणि सहमतीने उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. 

​तसेच जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे करुणा शर्मा याना न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसुन माझी निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतु दिसुन येतो. कृपया सदर बाब हि न्यायप्रविष्ठ असुन न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणारच आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपांत काहीही तथ्य नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!