बीड राजकारण

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत ! ; हा तर रावणापेक्षाही अधिक अत्याचारी… करुणा शर्माचा डीएमवर आरोप

मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे काही दिवसांपूर्वी अडचणीत आलेले अन पुन्हा त्या महिलेने तक्रार मागे घेतल्याने काहीसे रिलॅक्स झालेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे .आपल्या मुलांना चित्रकूट या बंगल्यावर डांबून ठेवण्यात आले असल्याची तक्रार करुणा धनंजय मुंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे .त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आले असून आता या प्रकरणी नेमकी काय भूमिका मुंडे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहेत. शिवाय, पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
करुणा यांनी पोलीस आयुक्ताकड़े दिलेल्या अर्जामध्ये माझे पती धनंजय मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहेत. मला त्यांच्याशी भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. जर माझ्या मुलांसोबत माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया. आणि मुंडे यांच्यावर कठोर करावाई करा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!