बीड माजलगाव

दुगड पंपाजवळ पुन्हा भीषण अपघात; दोन ठार

माजलगाव, दि. ३० (लोकाशा न्यूज) :  माजलगाव परभणी रोडवरील  घळाटवाडी फाट्यावर दुगड पंपानजीक दोन मोटारसायकल सामोरा समोर भिडल्याने भीषण अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मोटारसायकल शनिवार दि. 30 रोजी संध्याकाळी 7 वा. दरम्यान घडली. ज्या ठिकाणी ही घटना घडली याच भागात मागील काळात चार ते पाच अपघात घडले आहेत त्यामुळे हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. येथील जयमहेश कारखान्यावर वाहनाचे नियोजन लावून शुभम अनंता सुरवसे वय 24  रा देवगाव ता. वडवणी हा या रस्त्याने येत होता आणि गणेश गुलाबराव झेंटे  वय 21वर्ष रा. घळाटवाडी व सोबत पांडुरंग विष्णू शिंदे व त्याची बहीण कविता सूर्यकांत नरवडेहे दुसऱ्या मोटारसायकलवर जिचा क्रमांक एम.एच. 44 व्ही. 6182 गाडीवर  याच ठिकाणी आले असता त्यांच्यात भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की या अपघातात मोटार सायकल चालवत असलेले शुभम सुरवसे आणि गणेश झेंटे  हे जागेवरच मृत्यू पावले तर गणेश  याच्या गाडीवर असलेले पांडुरंग शिंदे आणि कविता कविता नरवडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ बीड या ठिकाणी हलविण्यात आले. अपघात स्थळावरून मयताना येथील ग्रामीण रुग्णालायत हलविण्या कमी महामार्ग पेट्रोल टीम मध्ये असलेले किशोर झगडे , प्रदीप भालेराव , अभिजित अलझेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.      

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!