Uncategorized मुंबई

सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार 25 जानेवारीला

मुंबई, ग्रामपंचायत निवडणुकीच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे रद्द झालेली सरपंचपदाची आरक्षण सोडत 25 जानेवारी रोजी होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या 06 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2-अ (१)(२) नुसार पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेले असून जिल्हयातील सरपंचपदासाठी आरक्षणाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या 11 डिसेंबर 2020 च्या आदेशान्वये माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर म्हणजेच 15 जानेवारी 2021 नंतर सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तसेच सरपंच आरक्षण सोडत कार्यकम तसेच सरपंच व
उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकर तथापी 30 दिवसाच्या आत
राबविण्याबाबत ग्रामविकास विभाग, मुंबई यांनी निर्देश दिले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!