मुंबई

शरद पवारांना मिळालं ‘तुतारीवाला माणूस’ चिन्ह, केंद्रीय निवडणूक आयोगाने केली घोषणा


प्मुबई
दि.22 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवारांचा पक्षा आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. आता चिन्हही बहाल केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत एक्स हॅन्डलवरून याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, एक तुतारी द्या मज आणुनि, फुंकिन मी जी स्वप्राणाने. भेदुनि टाकिन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने. अशी तुतारी द्या मजलागुनी! महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ’तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ’राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ’तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे! असे म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!