Uncategorized

बजरंग सोनवणेंनी शब्द पाळला, येडेश्‍वरीने दिला सर्वात जास्त भाव, ऊसाचा दुसरा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : केज तालुक्यातील आनंदगाव (सा.) येथील येडेश्‍वरी साखर कारखान्याने गुरूवारी (दि. 15) ऊस बिलाचा दुसरा हप्ता शंभर रूपयांप्रमाणे  शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. या कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला आहे, कारण त्यांच्या नेतृत्वात चालणार्‍या याच कारखान्याने सर्वात जास्त भाव दिला आहे.
येडेश्‍वरी कारखाना हा तालुक्यातील व कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून वाटचाल करीत आहे. गत हंगामात तालुक्यात अतिरिक्त ऊस असल्याने आपला ऊस शिल्लक राहतो की काय ? अशी भिती शेतकर्‍यांमध्ये होती. मात्र कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप करून कारखाना बंद केला. कारखान्याने सर्वाधिक भाव दिला असून यापुढे ही शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून कारखाना यशस्वीरित्या चालवला जाईल, असे येडेश्‍वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी सांगितले. कारखान्याने सन 2022-23 च्या नवव्या गळीत हंगामात ऊसाला 2 हजार 450 रूपये भाव देत चेअरमन बजरंग सोनवणे यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला आहे. कारखान्याने यापुर्वी 2450 रूपयांचा पहिला हप्ता दिला. त्यानंतर आता गुरूवारी शंभर रूपयांप्रमाणे दुसरा हप्ताही शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. त्यामुळे आता एकूण 2 हजार 550 रूपये बिल झाले असून शेतकर्‍यांनी चेअरमन बजरंग सोनवणे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान हा भाव परिसरातील कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!