Uncategorized

गोदाकाठच्या जनतेचा सहनशीलतेचा अंत संपला, रामेवाडी, बोरखेड,तेलसमुख, जळगव्हाण ग्रामस्थांचा वाळू साठ्यावर ‘ हल्लाबोल ‘परळीच्या तहसील पथकाला कार्यवाहीस भाग पाडले

परळी : वाळूमाफियांच्या दादागिरीला वैतागलेल्या गोदाकाठच्या जनतेचा अखेर सहनशीलतेचा अंत संपला आहे.काल रात्री रामेवाडी,बोरखेड,तेलसमुख, जळगव्हाण ह्या गावच्या ग्रामस्थांनी रामेवाडी परिसरात असलेला अवैध वाळूचा शेकडो ब्रास वाळूसाठ्यावर ‘हल्लाबोल ‘करत परळी तहसिल च्या वाळू विरोधी पथकला कार्यवाहीस भाग पाडले आहे.संतापलेल्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून, वाळूमाफियांनी गोदावरी च्या पात्रातून अवैध वाळू उपसा करत गोदाकाठच्या गावात दहशत निर्माण केली आहे. वाळू वाहतुकीने रामेवाडी,तेलसमुख येथील शेत रस्त्यांची पार वाट लावली आहे . तेलसमुख येथील काही शेतकरी महिलांनी याचा विरोध केला असता वाळूमाफियांनी त्यांना शिविगाळ केल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत.अवैध सर्रास वाहतुकीने शेती रस्ते खराब झाले आहेत, शेतात बैल गाडी घेऊन जाणे सुद्धा अवघड झाले . विरोध करणा-या शेतकऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मस्तावलेले वाळू माफिया देत आहेत.एक प्रकारे वाळूमाफियांनी गोदाकाठच्या लोकांवर जुलूम शाही सुरु केली आहे.परळी तहसील प्रशासन, बीड जिल्ह्या प्रशासन या कडे काना डोळा करत आहेत. हि संबधित प्रशासने कार्य करत नसल्याने अखेर वैतागलेल्या गोदाकाठ च्या ग्रामस्थांनी शेकडो ब्रास अवैध वाळू साठ्यावर हल्लाबोल करत परळी तहसील वाळू विरोधी पथकाला कार्यवाहीस भाग पाडले आहे.

नाईलाजाने पथक बसून,वाळूमाफिया हादरले ,
तहसीलदारांच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष

: संतप्त ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे परळी चे तहसील पथक वाळूसाठ्यावर रामवाडी येथे आता ठाण मांडून आहेत . नाईलाजाने का होइना त्यांना त्या ठिकाणी बसून रहावे लागत आहे आणि आता कार्यवाही देखिल करावी लागणार आहे. शेकडो ब्रास वाळू साठवलेले वाळूमाफिया आता हदरले आहेत.

आता ह्या कार्यवाहित तहसीलदारांची भूमिका काय असणार या कडे लोकांचे लक्ष लागले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!