परळी

जिल्हाधिकार्‍यांचा दणका, धान्याच्या अपहाराप्रकरणी परळीतील नऊ रेशन दुकानांचे लायसन रद्द


परळी, दि. 20 ऑक्टोबर : लाचारी सर्वस्व संपवते याप्रमाणे परळी शहरातील नऊ रेशन दुकानदारांनी गोरगरिबांसाठी आलेले धान्य वाटप न करता हजारो टन धान्याचा अपहार केल्याप्रकरणी शहरातील नऊ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामुळे परळी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील बरकत नगर भागात असलेले माजी नगराध्यक्ष जावेद खान पठाण यांचे रेशन दुकान, तसेच अविनाश अदोडे भिमनगर ,नाथराव मुंडे सोमेश्वर नगर, संग्राम गीते चांदापूर, कमलेश जगतकर पंचशील नगर, हर्षद अदोडे भिम नगर, राजन वाघमारे इंद्रानगर, मधुकर जायभाये हलगी गल्ली, आणि उद्धव मुंडे गुरुकृपा नगर, या नऊ रेशन दुकानदारांनी गोरगरिबांसाठी आलेल्या मोफत व इतर धान्याचा काळाबाजार करून हजारो टन धान्याचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाकडून या सर्व रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रुटनॉमिनीच्या नावाखाली या रेशन दुकानदारांनकडून हजारो क्विंटल धान्याचा अपहार केला जात होता. हे प्रकरण 2018 पासून सुरू होते. या प्रकरणी अनेक नागरिकांनी तक्रारी करूनही ही या दुकानदारांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. परंतु म्हणतात ना भ्रष्ट लोकांच्या पापाचा घडा भरला की त्यांना कोणीही वाचू शकत नाही या प्रमाणे या 9 रेशन दुकानदारांच्या पापाचा घडा भरला आणि अखेर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी या परळी शहरातील 9 ही भ्रष्ट रेशन दुकानदारावर कारवाई करण्यास भाग पडले. जिल्हाधिकार्‍यांनी तहसील प्रशासन तसेच पुरवठा विभागाकडून माहिती मागवली आणि तात्काळ या सर्व दुकानदारा विरुद्ध कारवाई केल्याने परळीसहा जिल्ह्यातील भ्रष्टाचार करणार्‍या रेशन दुकानदारांन मध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे परळी शहरात अजूनही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांकडे रेशन दुकानदारांचे लायसन आहे. अशा कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना मोफत राशन तर दिलेच नाही परंतु त्यांना मिळणारे इतर धान्यही दिले जात नाही. आणि हे सर्व धान्य काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. अखेर त्या भ्रष्टाचाराला वाचा फुटली आणि अधिकार्‍यांनी अशा भ्रष्ट रेशन दुकानदार विरुद्ध कारवाई केल्याने परळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अजूनही अनेक बहुतांशी रेशन दुकानदार सामान्य नागरिकांना तुमचे धान्य आलेच नाही, तुमची ऑनलाइन लिंक झालीच नाही ,अशी कारणे सांगून धान्य वाटप केले जात नाही. अशा ही दुकानदारांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच ही लायसन्स रद्द केली पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!