परळी

परळी बंद; वंचित आघाडीचा पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा


परळी, दि. २ (लोकाशा न्युज):– अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर याठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नुकतीच झालेली विटंबना आणि राज्यात दलित समाजावर आणि महिलांवर सातत्याने वाढत असलेले अत्याचार याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने परळी शहर बंद पुकारण्यात येऊन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या परळीच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
लॉकडाउनच्यादरम्यान महाविकास आघाडीच्या काळात राज्यामध्ये अनेक ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर अनेक ठिकाणी दलित समाजावर आणि महिलांवर अत्याचार वाढले. दलित समाजावर सातत्याने होत असलेले अन्यायावर वाचा फोडून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संजय गवळी, गौतम साळवे, मिलिंद घाडगे आदींनी परळी शहर बंदची हाक देऊन मोर्चाचे आयोजन केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत परळीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देत शहरातील आपापले व्यवहार कडकडीत बंद ठेवले तर पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. परळी शहर बंद आणि मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत शहरात प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!