परळी

वैद्यनाथ’ अडचणीत आहे, सर्वांनी मिळून कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे – पंकजाताई मुंडे

विसाव्या गळीत हंगामाचा झाला थाटात शुभारंभ

परळी दि. २५ ——लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी वैद्यनाथ साखर कारखाना स्वतःच्या लेकराप्रमाणे सांभाळला. तो आपल्या सर्वांचा आहे, त्याला जपलं पाहिजे. कारखाना सुरू होऊ नये, थकहमी मिळू नये म्हणून खूप प्रयत्न झाले तरी पण केवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अडचणीत असतानाही कारखाना सुरू करत आहे, कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी मिळून योगदान द्यावे असं आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते मोळी गव्हाणीत टाकुन करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा कारखान्याचे संचालक आर. टी. देशमुख होते. पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, वैद्यनाथ कारखान्यांमुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली असुन सुबत्ता वाढली आहे. मात्र गेल्या काही दिवसात निसर्गाने साथ दिली नाही म्हणून कारखाना अडचणीत आला होता. मात्र यावर्षी निसर्गाने साथ दिली पण विरोधकांनी थकहमी मिळू नये, कारखाना सुरू होऊ नये म्हणून प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. केवळ माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तो पुर्ण क्षमतेने चालवणार आहे. वैद्यनाथ कारखान्यावर अनेकांचे संसार अवलंबून आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वैद्यनाथची उभारणी केली आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करीत आहोत. कुणाचे वाईट करावे ही आम्हाला शिकवण नाही, सर्वांच्या हितामध्ये समाधान माणून आम्ही काम करतो. प्रचंड संघर्ष करून वैद्यनाथ चालू केला आहे. राजकारण न आणता यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य करावे आणि शेतकऱ्यांनीही आपला ऊस इतर कारखान्यांना न देता वैद्यनाथलाच द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ संचालक फुलचंद कराड यांनी केले.
यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपाचे राज्य सचिव राजेश देशमुख, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, उपाध्यक्ष गोरख धुमाळ, राजाभाऊ मुंडे, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, अंबाजोगाई कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष मोहन जगताप, योगेश्वरी कारखान्याचे अध्यक्ष रोहित देशमुख, जेष्ठ नेते जीवराज ढाकणे, रमेशराव कराड, शालिनीताई कराड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, युवानेते राजेश गित्ते, प्रा. बिभीषण फड, प्रा. पवन मुंडे, बळीराम गडदे, रवी कांदे, सुशिला फड, नितीन ढाकणे, डॉ. हरिश्चंद्र वंगे, डॉ. दे. घ. मुंडे, रामराव मुंडे, नरसिंग सिरसाट, सचिन गित्ते, पवन मोदानी, नितीन समशेट्टे, मोहन जोशी, चंद्रकांत देवकते आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी कारखान्याचे संचालक शिवाजी गुट्टे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. महानंदा गुट्टे यांच्या हस्ते सत्यनारायण व मोळीपुजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक सर्वश्री शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, पांडुरंगराव फड, ज्ञानोबा मुंडे, माधवराव मुंडे, किशनराव शिनगारे, व्यंकटराव कराड, त्रिंबकराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, आश्रोबा काळे, परमेश्वरराव फड, गणपतराव बनसोडे, संदीप लाहोटी, केशवराव माळी, भाऊसाहेब घोडके, आश्रोबा काळे, कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ज्ञानोबा सुरवसे यांनी तर आभार प्रदर्शन दिनकर मुंडे गुरूजी यांनी केले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!