परळी

अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले, पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना

परळी दि. २६ ——
छत्रपती राजर्षि शाहू अर्बन बँकेचे अध्यक्ष अर्जूनराव जाहेर पाटील यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील उमदे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

जाहेर पाटील यांच्या निधनाची वार्ता समजली, अतीव दुःख झाले. बीड जिल्हयाच्या सहकार, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात जाहेर पाटील यांचे कार्य उल्लेखनीय होते. शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने बीड जिल्हा एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!