परळी

पाच एक्करातील सोयाबीन जळून खाक, अज्ञाताने गंजीलाच लावली आग,पोहनेर येथील प्रकार

सिरसाळा, 10 ऑक्टोबर : पाच एक्करातील सोयाबीन जमा करुन बनवलेल्या गंजीला अज्ञताताने रात्री आग लावली यात पुर्ण सोयाबीन जळून खाक झाली आहे. हा प्रकार पोहनेर येथे घडला आहे. कासारवाडी रामेवाडी येथेल शेतकरी नवनाथ हरीभाऊ मात्रे यांनी पोहनेर शिवारात किरायाने पाच एक्कर जमीन केली होती. यात पुर्ण सोयाबीन हे पिक घेतले. सोयाबीन काढणीस आल्याने शेतातील सोयाबीन खुडून जमा केली. एका ठिकाणी ढिग घातला, रात्री कोणी तरी ह्या ढिगाला आग लावली यात सगळी सोयाबीन जळून खाक झाली आहे.
यामुळे नवनाथ मात्रे यांच्यावर खुप मोठे संकट ओढावले आहे.हाता तोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे.पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर आग लावणा-या अज्ञातांचा शोध लावावा अशा मगाणी सह नवनाथ मात्रे यांना अर्थीक मदत शासन/ प्रशासनाने करावी अशी मागणी देखील होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!