परळी

वाण धरण ओव्हरफ्लो; शनिवारी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपुजन

परळी, दि‌.9 (लोकाशा न्युज) : परळी शहरासह तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीचे पाण्यासाठी वरदान ठरणारे परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाचे शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन विधिवत पूजा करून करण्यात येणार असल्याची माहिती माजलगाव पाटबंधारे विभाग, परळीचे कार्यकारी अभियंता आर.ए.सलगरकर यांनी दिली.
परळी शहराला पाणी पुरवठा करणारे नागापुर येथील वाण धरण २३ सप्टेंबर रोजी पुर्ण क्षमतेने भरले असून अद्यापही ओसंडून वाहत आहे. गेली पन्नास चे साठ वर्षापासून या धरणाचे पाणी परळी शहरासह टोकवाडी, तळेगाव, नागापूर, दौनापूर, अस्वलआंबा, माळहिवरा, तडोळी, तडोळीतांडा, भिलेगाव, परचुंडी, मलनाथपुर, वडखेल, डाबी, पांगरी साखर कारखाना आणि बेलंबा आदी ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. गेली पाच ते सहा वर्षांमध्ये कधी नाही ते यावेळी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सध्या नागापूर धरण तुडुंब भरले असून ओसंडून वाहत आहे. आपल्याच मतदार संघातील वाण धरण ओव्हरफ्लो झाल्याने सहाजिकच परळीचे आमदार म्हणून आनंद झाल्याने वाण धरणाचे जलपुजन परळीचे आमदार आणि राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, जि.प.सदस्य अजय मुंडे, प्रा.मधुकर आघाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीती राहणार आहे. वाण प्रकल्पावर सकाळी ९ वा. विधीवत धार्मिक पद्धतीने जलपूजन होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. ए. सलगरकर यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!