बीड

उद्यापासून हॉटेल व लॉजिग सह खाजगी बस सुरू होणार


बीड, दि.01 (लोकाशा न्यूज):-मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत  व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत चाललेली गती मंदावली आहे.त्या अनुषंगाने दि. 2 सप्टेंबर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हॉटेल, लॉजिग, खाजगी बस, मिनी बस यांच्याकडे सर्व खाजगी वाहनातून सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्याच बरोबर सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या वेळेत सुरू राहणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!