बीड परळी

परळीत ऑनलाईन शिक्षणाचा बळी

चौदा वर्षीय शाळकरी मुलाची आत्महत्या !


परळी, दि.01(लोकाशा न्यूज):- परळीतील एका शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.परंतु ऑनलाईन अभ्यास जमत नसल्याने या अभ्यासाचा ताण घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील हिंद नगर भागात राहणाऱ्या १४ वर्षिय शाळकरी मुलांने गळफास लावून आत्महत्या केली आहे.शहरातील एका इंग्लिश स्कूल मध्ये हा मुलगा शिक्षण घेत होता. शशिकांत राजकुमार साखरे असे या मयताचे नाव आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!