केज

नात्याला काळीमा, चुलत सासर्‍यानेच केला सुनेवर बलात्कार

केज तालुक्यातील घटना, अर्ध्या तासात आरोपी पोलीसांच्या ताब्यात, नराधमाला तीन दिवसांची पोलीस कोठडीकेज : केज तालुक्यात चुलत सासर्‍यानेच नात्यातील सुनेवर बळजबरीने अकरा महिन्या पासून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

या बाबतची केज तालुक्यातील माळेवाडी येथे ऊस तोडणीचे व मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणार्‍या एका तीन मुलाची आई असलेल्या विवाहितेवर तिच्या नात्यातील चुलत सासर्‍यानेच बलात्कार केला आहे. मागील काही महिन्या पूर्वी त्याने पीडित महिलेच्या नवर्‍या सोबत मैत्रीचे संबंध ठेवून तिच्या घरी ये-जा करीत असे. एके दिवशी तिचा नवरा ते राहत असलेल्या वस्ती पासून थोड्या अंतरावर असलेल्या गावात गेल्याची संधी साधून तिचा नराधम चुलत सासरा तिच्या घरी गेला व तुझ्या नवर्‍याला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन वाईट हेतूने तिच्या हाताला धरून त्याने बळबरीने बलात्कार केला. अकरा महिन्या पासून तो नराधम हा जेव्हा जेव्हा पीडितेचा नवरा घरात नसेल ती संधी साधून तो घरी येऊन बळजबरीने वारंवार व सतत बलात्कार करीत होता. तसेच पीडितेच्या नवर्‍या सोबत भांडण करीत असे.
एके दिवशी त्याने पीडितेला फोन केला. तेव्हा तिच्या नवर्‍याला संशय आला म्हणून त्या बाबत अधिक चौकशी केली असता पीडितेने सर्व घटनाक्रम सांगितला. पीडितेच्या नवर्‍याने या घटनेची सर्व माहिती ही तिचे आई वडील, चुलते व बहीण यांनाही दिली होती. तिचा नवरा गरीब असल्याने व भीतीपोटी आज पर्यंत पीडित महिलेने सर्व सहन केले होते. त्या नंतर दि. 30 ऑगस्ट रोजी मध्यरात्री केज पोलीस स्टेशनला नराधम चुलत सासर्‍याच्या विरोधात गु.र.नं. 342/2020 भा.दं.वि. 376, 376 (2) (फ), 376 (2) (एन), 506 गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि पोलीस नाईक राजू गुंजाळ यांनी अवघ्या अर्ध्या तासात आरोपी नराधम चुलत सासरा याला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 1 सप्टेंबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!