मुंबई

आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या चर्चेत आहेत. यामागील कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये केलेला बदल ठरत आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाइवरुन महाराष्ट सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री’ हे शब्द काढून टाकले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे यावरुन चर्चा रंगली
आहे.

आदित्य ठाकरे यांनी अचानक ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल कऱण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण यानिमित्ताने आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना किंवा आदित्य ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेत्वृातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर प्रोफाईलवर, युवा सेनाचे अध्यक्ष, मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबाल असोसिएशनचे अध्यक्ष असं लिहण्यात आलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!