मुंबई

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सलीम जहॉंगीर यांची वर्णी


मुंबई, :- भारतीय जनता पार्टीत गेल्या अनेक वर्षांपासुन संघटन बांधणीसह विविध पदांवर केलेल्या कार्याची दखल घेत भाजपनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या शिफारसीवरून सलीम जहॉंगीर यांची राज्यस्तरावरील कार्यकारीणी संधी देण्यात आली आहे. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सलीम जहॉंगीर यांची निवड झाली आहे.
बीड जिल्ह्यात भाजपच्या संघटन बांधणीत महत्वाची भुमिका बजावणारे आणि सलग दोनवेळा अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार्‍या सलीम जहॉंगीर यांची राज्यस्तरावरील कार्यकारीणी निवड झाली आहे. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे आणि खा.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष म्हणुन कार्य करतांना सलीम जहॉंगीर यांनी अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्‍न मार्गी लावले. संघटन बांधणी केली. त्या अनुशंगाने पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी मो.एजाज देशमुख यांनी सलीम जहॉंगीर यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.या निवडीबद्दल त्यांचे मा मंत्री आमदार सुरेश धस,आमदार लक्ष्मण पवार,रमेश पोकळे,राजेंद्र मस्के याच्यासहीत सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!