बीड

आ. संदिप क्षीरसागर होम क्वारंटाईन

तुमचे प्रेम, पाठबळ, आशिर्वाद माझ्या पाठिशी, प्रत्यक्ष भेट टाळावी आ. संदिप क्षीरसागरांचे आवाहनबीड : गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही-आम्ही कोरोनाशी लढा देत आहोत अशा स्थितीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला कोरोना संसर्गाशी लक्षणे आढळलेली आहेत. त्यामुळे आ.संदिप भैय्या क्षीरसागर होम क्वारंटाईन आहेत. त्यांनी मी आपल्यासोबत प्रत्यक्षात नसेल परंतू मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझे आहात. तुम्ही सामाजिक भावनेने जे उपक्रम हाती घेतले आहेत त्यात मी प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे असे समजून सोशल डिस्टन्सचे नियम पाळून पुर्णत्वास न्यावेत. जन माणसाला कोणता त्रास होवू नये याची खबरदारी घ्यावी. निवासस्थानी प्रत्यक्ष भेट टाळावी. तुमचे प्रेम, पाठबळ, ज्येष्ठांचा आशिर्वाद माझ्या पाठिशी कायम राहिल. जनतेचा सेवेकरी म्हणून काम करत असतांना तुमच्या प्रेमाचं पाठबळ बळ देत राहिल असे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष भेटी टाळुन आ.संदिप भैय्या क्षीरसागर उपस्थित आहेत असे समजून वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, सामाजिक उपक्रम राबवावेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड कार्यालयाच्या वतीने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक माणिक खांडे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा दि.27 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड, नवगण प्रतिष्ठाण व तालुका, शहर, गावपातळीवर विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे जगवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या कुटुंबियाती व्यक्तीला कोरोनाचे लक्षणे आढळेली आहेत. या कारणामुळे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्यासह कुटुंबातील व्यक्ती शासनाच्या निर्देशानुसार होम क्वारंटाईन झालेले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वजण लढा देत आहोत. वाढदिवसाच्या निमित्ताने आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी बीड नव्हे तर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चाहत्यांची त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांची गर्दी होवू शकते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता होणारी गर्दी व त्यापासून होणारा धोका लक्षात घेता आ.संदिप भैय्या क्षीरसागर हे प्रत्यक्ष तुमच्यासोबतच आहेत असे समजून कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले वृक्षारोपण, सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम पूर्णत्वास न्यावेत. नगर रोड येथील निवासस्थानी कोणी गर्दी करून असे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!