बीड

काचेच्या तुकड्याने वार करून घेत कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न


बीड : नातेवाईकासोबत बोलण्याची सवलत मिळण्याकरिता आवश्यक असणारा पोलीस तपासणी अहवाल लवकर येत नसल्याच्या नैराश्यातून जिल्हा कारागृहातील एका कैद्याने स्वतःवर काचेच्या तुकड्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना सोमवारी (दि.24) रात्री उशिरा घडली.
सोमा शेरू भोसले असे त्या कैद्याचे नाव आहे. कारागृहातील कैद्यांना दूरध्वनीवरून नातेवाईकांसोबत बोलण्याचे मुभा मिळण्यासाठी पोलिसांचा तपासणी अहवाल आवश्यक असतो. मात्र, हा अहवाल लवकर येत नसल्याने सोमा भोसले नाराज होता. अखेर नैराश्यातून त्याने सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास कारागृहातील शौचालयाच्या समोर त्याने काचेच्या तुकड्याने स्वतःच्या हातावर, मनगटावर, मानेवर आणि डोक्यावर मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हे पाहून अन्य कैद्यांनी ड्युटीवरील पोलीस कर्मचार्‍यांना आवाज देऊन बोलावून घेतले. जखमी झालेल्या सोमा वर पोलीस कर्मचार्‍यांनी औषधोपचार केला. याप्रकरणी पोलीस शिपाई विजयकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरून त्या कैद्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!