बीड

पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

facebook sharing button
twitter sharing button
email sharing button
messenger sharing button

बीड – पोहण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी खापर पांगरी येथे घडली. सदरील मुलाचा मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आला. 
समर्थ कल्याण मिसाळ (वय १२ वर्षे) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मुलाच्या घरच्यांना झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा शोध विहिरीमध्ये अग्निशामक दलासह गावातील लोक घेत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळून आला नव्हता. आज सकाळी विहिरीच्या बाहेर मृतदेह काढून तो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या दुर्दैवी घटनेने पांगरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!