बीड

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक, अपघातात दोन ठार

facebook sharing button
twitter sharing button
email sharing button
messenger sharing button
whatsapp sharing button


नेकनूर :- भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने मोटर सायकलला धडक दिल्याने या अपघातात मोटर सायलकवरील दोघे जण ठार झाल्याची घटना काल रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालका विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तु पोकळे रा.दोघेही पोत्रा हे रात्री ८ वाजता आपली मोटरसायकल क्रमांक एम.एच.१२ एलई ६४६६ यावर जात होते. सात्रापोत्रा रस्त्यावर समोरून भरधाव वेगात येणार्‍या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीररित्या जखमी होवून ठार झाले. घटनेची माहिती नेकनूर ठाण्याचे पीएसआय दिपक रोटे, युनुस बागवान, जायभाय यांना झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक शिवदत्तु बंकट साखरे रा.चांदणी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय विलास जाधव हे करत आहेत. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!