बीड

जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव; 4 फुट मुर्ती अन् आरतीला 5 भाविक

परवानगीसह या आहेत आटी-शर्ती


बीड, दि.20 (लोकाशा न्युज) ः जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात काही आर्टी-शर्तीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशाची मुर्ती 4 फुटांपेक्षा कमी व आरतीला केवळ 5 भाविक बोलवता येणार आहेत. यापेक्षा जास्त भाविक जमवल्यास मंडळाला कारवाईला समोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवावर अनेक निर्बंध घातले गेले आहेत. सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि.20 ऑगस्ट रोजी मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुचनाचे पालन करणार्‍या मंडळासह परवानगी देण्यात येणार आहे. शिवाय परवानगीनंतर नियमांचे उल्लंघन झाल्यास मंडळावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.

वाचा आटी

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!