महाराष्ट्र

निवासी डॉक्टरसह डीनच्या छळाला कंटाळून जेजे हॉस्पिटलच्या 9 डॉक्टरांचे सामुहिक राजीनामे; राजीनाम्यात डॉ.तात्याराव लहानेंसह इतर आठ डॉक्टरांचे राजीनामे

मुंबई -मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील नेत्र विभागातील 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. प्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे खळबळ माजलीय.  डॉ. तात्याराव लहानेंसोबत डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ.प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ.आश्विन बाफना आणि डॉ. हेमालिनी मेहता या 9 जणांनी आपले राजीनामे दिले आहेत. निवासी डॉक्टर आणि जे जे हॉस्पिटलच्या डीनच्या छळाला कंटाळून राजीनामे दिल्याचा आरोप डॉ. तात्याराव लहाने यांनी  केला.          
 देशात सुप्रसिद्ध असलेल्या जे. जे. रुग्णालयात डॉक्टर वॉर उफाळून आले आहे. या वादातून  डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह 8 डॉक्टरांनी आपली सेवा थांबवली आहे. रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्यासह जाचाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे लहाने यांनी सांगितले आहे.डॉक्टर तात्याराव लहाने यांचा 2009 पासून जेजे वर एकछत्री अंमल होता. तो आज संपुष्टात आला आहे. याआधी डॉ. तात्याराव लहाने विरुद्ध डॉ अशोक आंनद , डॉ चंदनावले , डॉ मेडेकर आणि डॉक्टर पल्लवी सापळे हे वाद चांगलेच गाजले. अनेकांनी हा वाद कोर्टात नेला तर काही जनांची रवानगी ही थेट जेजे बाहेर करण्यात आली होती.डॉ.तात्याराव लहाने यांचे राजकीय संबंध आणि सामाजिक वजन यांविषयी कमालीचा दरारा जेजे रुग्णालयात होता. चार वर्षांपूर्वी नेत्र विभागाच्या 300 डॉक्टरांनी लहाने यांच्या विरोधात बंड केले होते. यावेळी न्यायमूर्ती डागा यांची समिती नेमण्यात आली होती . पण या समितीचा आहवाल कधी पुढे येऊ शकला नाही. पुढे डीन पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर लहाने यांची डेप्युटी डायरेक्टर त्यानंतर सल्लागार अशा पदावर वर्णी लागली होती.पल्लवी सापळे यांचा दोन वर्षांपूर्वी डीन म्हणून वर्णी लागणार होती. त्यावेळी त्याना कोविड काळात विशेष जबाबदारी म्हणून धुळे येथे पाठवण्यात आले. त्याच ठिकाणी त्याना डिन म्हणून जबाबदारी देण्यात आली. या मागे डॉ.लहाने असल्याची चर्चा त्यावेळी जोरात सुरू होती. हा वाद सुरूच राहिल्याने जेजे मध्ये दोन गट पडले.पल्लवी सापळे जेजे रुग्णालाच्या डीन झाल्या आणि त्यांनी लहाने यांच्या विरोधात मोर्चा वळवला. लहाने यांच्या गटातील डॉक्टर यांची चौकशी सुरु केली. लहाने यांचा मुलगा आणि सून तसेच नेत्र विभागाच्या प्रमुख रागिनी पारेख यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा लावला होता. यात डॉ. लहाने यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.गेल्या दोन वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या मुळे डॉ. लहाने यांना जीवदान मिळाल्याची चर्चा होती. गिरीश महाजन यांच्या काळात राज्यभर होणार्‍या कँपमध्ये लहाने यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. यावेळी लहाने गिरीश महाजन हे एक समन्वयाचे सूत्र झाले होते. लहाने आणि डॉ. चंदनवले वादात गिरीश महाजन यांनी कायम लहाने यांना झुकते माप दिल्याचे बोलले जाते. पण आता पल्लवी सापळे यांच्या वादात लहाने यांनी तक्रारी करुन देखील महाजन यांनी लक्ष दिल नसल्याचे बोलले जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!