करिअर

बारावीचा निकाल उद्या;शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

HSC बोर्डाच्या 12 वीचा निकाल उद्या सायंकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सोमवारी ही माहिती जारी केली. http://mh-hsc.ac.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे.
कोरोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसह जवळपास सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या. यावर्षीचा बारावीचा निकाल परीक्षा न घेता मूल्यमापन पद्धतीवर जारी केले जाणार आहेत. यामध्ये दहावी, अकरावीचे मार्क आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांचे गुण यांचा विचार केला जाणार आहे.
शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी जारी केला जाणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार, अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पाहता येणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!