महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील पंकजाताईंना भेटले, दोघांमध्ये तासभर झाली चर्चा


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या तात्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची मंगळवारी त्यांच्या वरळीतील कार्यालयात जावून भेट घेतली. त्या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या गुप्त भेटीत नेमकी त्या दोघांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मात्र समजू शकले नाही.

केंद्रीय मंत्रीपदासाठी सर्व बाजूंनी सक्षम असतानाही खा. प्रीतमताई मुंडे यांना संधी दिली नाही, यामागे फडणवीसांचा हात असल्याचा सर्वांनाच संशय आहे. या संशयामुळेच बीड जिल्ह्यासह राज्यातील मुंडे भक्तांनी आक्रमक पावित्रा घेवून आपले राजीनामे दिले होते, यावर पंकजाताईंनीही स्वत: आक्रमक पावित्रा घेवून आपल्या कार्यकर्त्यांना शांत केले होते, विशेष म्हणजे मागच्या आठ दिवसांपुर्वीच पंकजाताईंनी आपल्या भाषणातून कानफुक्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला होता, यामुळे प्रदेश भाजपात मोठी खळबळ उडाली होती, अखेर मंगळवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरळीतील कार्यालयात जावून पंकजाताईंची भेट घेतली, यावेळी त्या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मात्र समोर आले नाही, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी ताईंच्या कार्यालयात झालेल्या सत्काराचा फोटो शेअर केल्यानंतर पाटील आणि मुंडेंमध्ये भेट झाल्याचे समोर आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!