महाराष्ट्र

ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यास बळ प्रदान करो, मुंबईतील घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांबद्दल खा. प्रीतमताईंनी व्यक्त केली हळहळ


मुंबई, दि. 18 (लोकाशा न्यूज) : मुंबईत पावसाने रविवारी अक्षरश: थैमान घातलंय. मुसळधार पडणार्‍या पावसामुळे मुंबईत तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठी दुर्घटना ही चेंबूरमध्ये घडली. चेंबूर मध्ये आता रेस्क्यू ऑपरेशन पूर्णत संपलेलं आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर 2 जणांवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर बचावकार्य सुरू होतं. ते रात्री संपले आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता 2 जणांना राजावाडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे मदतकार्य आणि रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेर ऑपरेशन आता संपलेल आहे, अशी माहिती आशिष कुमार यांनी दिली. तसंच, घटनास्थळी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे काही जणांना स्थलांतरीत केले आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांबद्दल खा. प्रीतमताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत नागरीकांचा मृत्यू झाल्याची वार्ता दुःखद आणि दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या मृतांना सद्गगती मिळो. तसेच ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यास बळ प्रदान करो, असे खा. प्रीतमताई मुंडे यांनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!