परळी

लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे- ओबीसींच्या आरक्षणाचा घात करणाऱ्या राज्य सरकारला खा.डाॅ.प्रितमताईंनी सुनावले खडेबोल, परळीतील चक्काजाम आंदोलनाने आघाडीला घाम फुटला, सारे रस्ते जाम, ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेल्या खा. मुंडेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

परळी वैजनाथ, प्रतिनिधी….
      परळीचे प्रचंड आंदोलन ए तो सिर्फ झाॅंकी है, आगे का  आंदोलन बाकी है ‘ असे म्हणत पंकजाताई पुढची दिशा ठरवुन सांगतील त्याप्रमाणे आंदोलन पुढे जाईल. ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत.सरकारला झोप येऊ देणार नाही. सरकार ओबीसीला भोळं समजत असेल तर लक्षात ठेवा, ओबीसी समाज भोळा आहे पण त्यांच्याकडे पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे असे म्हणत खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे.

      ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आज (शनिवार दि.२६ जून ) रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.   परळीत खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या  नेतृत्वाखाली  चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरातील इटके कॉर्नर चौकात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात ओबीसी समाजासह भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता.यावेळी बोलताना खा.प्रितमताई मुंडे यांनी सरकारला इशारा दिला.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. यापुढचे आंदोलन यापेक्षाही तीव्र असेल असे त्यांनी  सांगितले.
या आंदोलनात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.परळीत ओबीसींचे प्रचंड आंदोलन झाले. सारे रस्ते जाम झाले होते. यावेळी खा.डाॅ.प्रितमताई मुंडे सह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान परळीतील या आंदोलनाने आघाडी सरकारला घाम फुटला होता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!