परळी

घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन विवाहितेवर बलत्कार,खामगाव येथील घटना

   

सिरसाळा न्यूज : घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन एका नराधमाने बलत्कार विवाहितेचा बलत्कार केल्याची घटना परळी तालुक्यातील सिरसाळा नजीक च्या खामगाव येथे घडली आहे. ह्या घटनेने खामगावात खळबळ उडाली आहे. पिडित महिलेना दिलेल्या फिर्यादी वरुन माहिती नुसार, दिनांक २८ जून च्या पहाटे ४ वाजता लहु लिंबाजी घडवे हा घरी आला ,घराची कडी वाजवली, पती असल्याचे वाटले म्हणून संबधित विवाहितेने दरवाजा उघडला, लहु घडवे याने महिलेस धरुन बाजावर पाडून बलत्कार केला व गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादी वरुन सिरसाळा पोलिस स्टेशन येथे आरोपी लहू लिंबाची घडवे याच्या विरुद्ध कलम ३७६ ,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गायकवाड मॅडम करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!