बीड

उद्या पंकजाताई आघाडी सरकारला ओबीसींची ताकत दाखवून देणार, जशी वादळात वीज कडाडते तसाच आवाज ओबीसींचा झाला पाहिजे, होणार ना?, चक्काजाम यशस्वी करण्यासाठी ताईंनी घातली साद, आंदोलनासाठी स्वत: पुण्यातून तर खा. प्रीतमताई परळीतून मैदानात


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : आज सकाळी 9:30 वाजता छत्रपती शाहू महाराजांचे पूजन,10 वाजता चक्का जामची सुरुवात करायची आहे. मी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे स्वतः सहभागी होणार, मुंडे साहेब जरी नसतील तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचत आहे, ओबीसी हक्काचा आवाज जणू वादळात वीज कडाडते असा झाला पाहिजे..होणार ना?, अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी घातली आहे. दरम्यान हा चक्काजाम यशस्वी करून झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी स्वत: पंकजाताई पुण्यातील तर खा. प्रीतमताई ह्या परळीत आंदोलनात सहभागी होणार आहेत.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणार्‍या आघाडी सरकारच्या नाकर्त्या कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज 26 जून रोजी राज्यात एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली. जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी वक्तव्ये करतात. मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या तरी आघाडी सरकारमधील मंत्री गप्प आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत. राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. आघाडी सरकारचे मंत्री निवडणुका होऊ देणार नाहीत , असे फक्त म्हणत राहिले. ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठीच पंकजाताईच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. राज्यभर 1 हजार ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहोत. पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!