बीड

मुख्यमंत्र्यांच्या कौतूकामुळे बीडचे लुखेगाव राज्यात चमकले, कोरोनाच्या दोन्ही लाटेत लुखेगावात एकही बाधित रूग्ण नाही वा एकही मृत्यू नाही, मुख्यमंत्र्यांशी महिला सरपंच पठाण हजेराबी कडेखाँ यांच्याशी थेट संवाद

बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : राज्यातील कोवीड मुक्त गावचे सरपंच व कोवीड -19 चा प्रसार रोखण्यासाठी उत्कृष्ट कार्य केलेले सरंपचांसोबत शुक्रवारी दु . 3:30 वा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ग्रामविकास मंत्री . हसनजी मुश्रीफ व मा . ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार यांनी संवाद साधला व मार्गदर्शन केले. बीड जिल्हयातून ग्रामपंचायत लुखेगाव (ता . माजलगाव) येथील सरंपच श्रीमती पटाण हजेराबी कडेखाँ यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यांनी आपले गाव दोन्ही कोरोना लाटेमध्ये कोवीड मुक्त ठेवले असून गावात कोरोनाचा शिरकाव होवू दिला नाही. त्यांनी रमजान काळात देखील गावातील सर्व नागरिकांना घरातूनच नमाज पडण्यासाटी प्रवृत्त केले. तसेच गावातील लग्नसमारंभ व्हिडीओ कॉलव्दारे लग्नविधी उरकण्याबाबत मार्गदर्शन करून कार्य पार पाडले. गावातून बाहेरगावी जाणारे -येणार्‍यांचे अँटीजन टेस्ट केल्या. यामुळे त्यांचे गाव दोनही लाटांमध्ये कोरोना मुक्त राहीले. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व मा . ग्रामविकास राज्यमंत्री यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सदर व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार ( भा.प्र.से. ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पं ) डी.बी. गिरी, ग्रामपंचायत रोहतवाडी , ता . पाटोदा . येथील सरंपच श्री . पांडूरंग दादाराव नागरगोजे व दोन्ही गावचे ग्रामसेवक हजर होते. सदर व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर मा. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आपल्या दालनामध्ये दोन्ही सरंपच व ग्रामसेवकांचा वृक्ष रोप देऊन सत्कार केला व यापुढील काळात पण आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्याबाबत अवाहन केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!