बीड

भाटुंबा पाटीवर दुचाकी-टेम्पोच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार


केज, दि. 11 (लोकाशा न्यूज) : केज-अंबाजोगाई रोड वर चंदन सावरगाव जवळी पाठवा पाटीजवळ मोटारसायकलला टेम्पोने मागील बाजूने धडक दिली यात मोटरसायकलवर मागे बसलेल्या शिक्षिका सौ अश्विनी अशोक धपाटे वय 51 वर्षे या जागीच ठार झाल्या.
या बाबतची माहिती अशी की, दि. 11 जून, शुक्रवार रोजी सायंकाळी 6: 00 वा. च्या सुमारास अशोक धपाटे व त्यांची पत्नी अश्विनी धपाटे या मोटारसायकल क्रमांक (एमएच-23/जे/9916) भाटुंबा येथून केजकडे येत होते. ते भाटुंबा गावातून येणार्‍या अप्रोच रोडवरून केज-अंबाजोगाई या मुख्य रोडला येत असताना त्यांच्या मागील बाजूने येणार्‍या टेम्पो क्रमांक (एमएच-17/एजी-1459) या टेंपोने त्यांना मागून जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकल सुमारे पन्नास फूट फरफटत गेली. या धडकेत कुंबेफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. अश्विनी अशोक धपाटे वय 51 वर्षे या जागीच ठार झाल्या असून त्यांचे पती अशोक धपाटे हे गंभीर जखमी झाले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!