बीड

रस्त्यावरुन जात असलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नेकरून :- कळसंबर येथील आजिनाथ वाघमारे ( वय ३८ ) हे त्यांच्या ऊस लावलेल्या शेतात होते. काही वेळानंतर ते घराकडे जाण्यास निघाले. ते पांदी रस्त्याजवळ पोहचले असताना अचानक बिबट्याने झडप घातली. बिबट्याने अचानक केलेल्या या हल्यात त्यांच्या तोंडाला इजा झाली. त्यांना नेकनूर येथून बीडच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कळसंबर येथील उसाच्या शेतात आढळलेल्या बिबट्या भोवती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. पोलीस आल्यानंतर ही गर्दी बाजूला झाली मात्र शांत असलेला बिबट्या गोंधळामुळे बिथरला होता. काही कालावधीने येथून घराकडे परतणाऱ्या एका ३८ वर्षीय युवकावर त्याने हल्ला केला. यामध्ये युवकाच्या तोंडाला इजा झाली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड तालुक्यातील नेकनूरपासून आठ किमी किमी अंतरावर कळसंबर हे गाव असून या गावाच्या बाजूला डोंगराचा भाग आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शेतात काम करणाऱ्या काही जणांना गोरख वाघमारे यांच्या उसाच्या शेतात बिबट्या दिसला. त्यांनी गावातील इतरांना याची कल्पना दिल्याने ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या शेताकडे धावले.
पोलिसांना कल्पना मिळाल्याने एपीआय लक्ष्मण केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे ,खांडेकर, डोंगरे या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर वन विभागाचे अमोल मुंडे, दिनेश मोरे, अच्युत तोंडेही माहिती मिळाताच या ठिकाणी आले. दरम्यान, काही कुत्रे बिबट्या वर धावत होते या ठिकाणी गोंधळ वाढल्याने बिबट्याने जैतळवाडी गावाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर अधिकारी परतले ग्रामस्थही घराकडे परतत होते. याचवेळी गावाच्या बाहेर पांदण रस्त्याने तिघे जण घराकडे चालले होते. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात अजिनाथ वाघमारे ( वय ३८ ) या युवकच्या चेहरा जखमी झाला. त्याला नेकनूरच्या रुग्णालयातून बीडच्या रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे परिसरातील अनेक गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!