बीड

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक हक्कासाठी करणार बेमुदत संप,महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

बीड । प्रतिनिधी
शासनाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा 15 जून 2021 पासून सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संप करणार असल्याचे निवेदन गुरुवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी दिले.
बीड जिल्ह्यात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार मिशन झीरो डेथ राबविण्यात आले. त्याचा कोणताही मोबदला ठरवला नाही. ही बाब मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन सदर कामासाठी ग्राम स्तरावर ग्राम निधीमधून 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी त्यांना विनंती केली. संघटनेची ही मागणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ मंजूर करून श्री गिरी साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना बीडीओंना आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना एक हजार रुपये देण्याचे आदेश काढावे असे सांगितले. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींना त्यांया ग्रामपंचायत कडून 1000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता तात्काळ मिळणार आहे. सदर आदेशाची प्रत पुढच्या हप्त्यात व्हाट्सअप वर पाठवली जाईल. त्याआधारे सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनीनी आपआपल्या ग्रामपंचायत कडून एक हजार रुपयांची मागणी करावी. जर कोणी पैसे देण्यास नकार दिला तर महासंघास कळवावे. असे अवाहन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, प्रदेशकार्याध्यक्ष कमलताई बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी केले आहे.
17 जुलै 2020 च्या शासकिय आदेशानुसार अशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात रु 2000 व गटप्रर्तकांच्या मोबदल्यात रु. 300 प्रति दिन विशष भत्ता कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असेपर्यंत लागु करावा. प्रेरक प्रकल्पाच्या रिपोर्टिंगसाठी दर सहामाही 1500 रुपये मोबदला द्यावा. स्टेशनरी साठी 3000 रुपेय द्यावेत. शासकिय सेवेत समाविष्ट करुन घेण्यात यावे. यासह विविध महत्वाच्या मागण्या घेवून महासंघ संघर्ष करत आहे. त्यांच्या संघर्षला यशही मिळत आहे. मात्र आता या मागण्या मन्य न झाल्यास येत्या 15 जून 2021 पासून सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संप करणार असल्याचे निवेदन गुरुवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, प्रदेशकार्याध्यक्ष कमलताई बांगर ,राज्य संघटक दत्ता देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी दिले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!