अंबाजोगाई

कोनोना विरूध्दच्या लढाईत बीडच्या एमपी जनतेसोबत ऑन द फिल्ड !,रूग्णांना डॉ. प्रीतमताईंमध्ये माणसातला देव दिसू लागला, परळी अंबाजोगाईतही रूग्णांशी संवाद साधून ताईंनी आरोग्य प्रशासन केले सर्तक



परळी, अंबाजोगाई, दि. 15 (लोकाशा न्यूज) : जसा कोरोना आला आहे तशी कोविड वार्डात जाण्याची हिंमत आतापर्यंत एकाही राजकिय नेत्याने केलेली नाही, याला अपवाद मात्र बीडच्या खा. प्रीतमताई मुंडे ह्या एकमेव आहेत. त्या गेल्या वर्षीही कोविड वार्डात गेल्या आणि त्यांनी त्या ठिकाणच्या रूग्णांशी संवाद साधला, अगदी याच पध्दतीने याही वर्षी त्या थेट कोविड वार्डात जावून रूग्णांशी संवाद साधत आहेत. ताईंच्या या भेटीमुळे कोविड ग्रस्त रूग्णांना मोठा आधार मिळत आहेत. ताई आमच्यासाठी एका देवाप्रमाणेच धावून आल्याच्या प्रतिक्रीया आता रूग्णांमधून ऐकायला मिळत आहेत. बीडप्रमाणेच काल त्यांनी परळी आणि अंबाजोगाईतील कोविड ग्रस्त रूग्णांशी संवाद साधून त्या ठिकाणची आरोग्य यंत्रणा रूग्णांच्या सेवेत सर्तक केली आहे.
जिल्हा रूग्णालयाचा आढावा घेतल्यानंतर खा. प्रीतमताईंनी दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुरूवारी परळी आणि अंबाजोगाईतील आरोग्य विभागाचा आढावा घेतला. सकाळी परळी शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांकडून येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे परंतु रुग्ण संख्येत झालेल्या चिंताजनक वाढीमुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून रुग्णांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याच्या सूचना यावेळी खा. प्रीतमताईंनी दिल्या, दुसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि मुबलक सुविधा देण्याची क्षमता नाही, परंतु वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य सेवकांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आपणही आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला जवाबदारीने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी अंबाजोगाईतील स्वा.रा.ती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोविड कक्षास भेट दिली, तसेच रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयातील कोविड रुग्णांची संख्या, बेड्स ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेची माहिती घेऊन भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. आस्थेवाईकपणे विचारपुस करणार्‍या खा. प्रीतमताईं आमच्यासाठी माणसातला एक देवच असल्याच्या प्रतिक्रीया आता कोविड सेंटरमधील रूग्णांमधून व्यक्त केला जात आहेत. दरम्यान या आढाव्यादरम्यान त्यांच्यासोबत भाजपचे युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा हेही उपस्थितीत होते.

डॉक्टर प्रीतमताई तुम्ही सुध्दा काळजी घ्या – पंकजाताई
खा. प्रीतमताई जिल्ह्यातील थेट कोविड वार्डात जावून रूग्णांशी संवाद साधत आहेत. याअनुषंगानेच पंकजाताईंनीही खा. प्रीतमताईंचा एक फोटो शेअर करून ‘डॉक्टर प्रीतमताई तुम्ही सुध्दा काळजी घ्या, असे म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!