बीड

“आरोग्य यंत्रणेच्या हातात जिल्हा सुरक्षित” : केंद्रीय पथकांडुन कौतुकाची थाप; कोव्हिडचा दोन तास घेतला राऊंड

बीड,दि. 8 (लोकाशा न्यूज):- गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने आज गुरुवार दि. 8 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील कोव्हिडं सेंटरला भेट देत संपूर्ण राउंड घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रनेणे केलेल्या ग्रेट नियोजनामुळे जिल्हा सुरक्षित असल्याचे केंद्रीय पथक प्रमुख डॉ. रक्षा कुंदल यांनी म्हटले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, तहसीलदार उमने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सचिन आंधळकर, डॉ. ढाकणे, डॉ. माने, डॉ. मंडलेजा, डॉ. जयश्री बांगर, मेट्रन संगीता दिंडकर, अतिरिक्त मेट्रन विजया शेळके, अनिल नवले, कॉलमन किरण जगताप, मुकादम बिभीषण घावाने, मुकादम नवनाथ सोनटक्के, नावेद, संजय गागट यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.

तीन दिवस घेणार जिल्ह्याचा आढावा
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णामूळे आज पासून पुढील दिन दिवस जिल्ह्यात सर्वच कोव्हिडं सेंटर ला भेटी देत जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याची माहिती दिली असून जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोव्हिडं रुग्णाना भेटी देणार असल्याचेही सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!