बीड

ट्रॅफिक पोलिसाशी अरेरावी करणे पडले महागात, दोघांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा,बीड जिल्हा व सत्र न्यायालय चा निकाल


बीड, वाहतूक पोलिसांचे गजू रे धरून शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात दोघांना एक वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अनिल धसे यांनी बाजू मांडली
बीड शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी विजय सोनाजी निकाळजे हे कर्तव्यावर असताना( 30 अंकुश विठ्ठल जाधव राहणार पाचेगाव तांडा तालुका गेवराई )व(२३ बळीराम नामदेव राठोड राहणार जायकवाडी तालुका माजलगाव) यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे विजय निकाळजे यांनी त्यांना अडवल होत यावेळी आरोपी दोघांनी निकाळजे त्यांचे गजू रे धरून तुला वाहन अडवण्याचा अधिकार नाही असे म्हणून ट्राफिक पोलीस निकाळजे यांच्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता त्यावेळी निकाळजे यांनी दोन्ही आरोपींना गाडी संबंधित असलेले कागदपत्रांची मागणी केली असता दोन्ही आरोपीने कसल्याही प्रकारचे कागदपत्र त्यांना न देता निकाळजे यांच्याशी हुज्जत घालून सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केला यावरून याप्रकरणी विजय निकाळजे यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस बी जाधव यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते जिल्हा व सत्र न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली आणि शुक्रवारी या प्रकरणात मा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय हेमंत महाजन यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अनिल धसे यांनी सरकारची बाजू मांडली त्यांना ए एस आय इंगळे यांनी सरकारी वकील अनिल धसे यांना सहकार्य केलं

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!