धारूर

राज्यासाठी आदर्श असलेल्या हिवरेबाजार आणि राळेगणसिध्दीप्रमाणेच आवरगावची नोंद होणार – अजित कुंभार जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ठरलेल्या आवरगावला सीईओंनी दिली सदिच्छा भेट


धारूर, दि.4 : बीड जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ठरलेल्या आवरगावला (ता.धारूर) बुधवारी सीईओ अजित कुंभार यांनी सदिच्छा भेट दिली, अत्यंत चांगल्या पध्दतीने आवरगावकरांनी एकत्र येवून विकासाला धार दिली आहे, भविष्यात या गावाची नोंद राज्यासाठी आदर्श असलेल्या हिवरेबाजार, आणि राळेगणसिध्दीप्रमाणे झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही यावेळी सीईओ अजित कुंभार यांनी बोलून दाखविला आहे.

आवरगाव (ता.धारूर) हे गाव आर. आर. आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेले आहे. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अजित कुंभार यांनी अचाणक या गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, व्यायामशाळा, वाचनालय, क्रीडांगण, वृक्षलागवड, वृक्षासंवर्धन, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, रस्ते आदि सार्वजनिक ठिकानांची व गाव स्वच्छतेचे नियोजन या सर्व गोष्टींना अजित कुंभार यांनी भेट दिली. या विशेष भेटीत अजित कुंभार यांनी वरील सर्व सार्वजनिक ठिकानांची पाहणी करत आनंद व्यक्त करत सरपंच अमोल जगताप यांच्यासह गावकर्‍यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनील शिंदे, आगळे साहेब, माने साहेब, सरपंच अमोल जगताप यांच्या सह समस्त गावकरी उपस्तिथ होते. मला आवरगाव पहिल्यानंतर आनंद वाटला, खरचं तुम्ही खूप छान काम केले आहे. आपल्या बीड जिल्ह्यात सुद्धा हिवरेबाजार, राळेगण सिद्धी यांच्यासारखे आवरगाव हे गाव आहे, हे गाव पाहण्यासाठी बाहेरून लोक येतील, अशा प्रकारे आपलंं गाव तयार झालेले आहे, तरी सातत्य ठेवा व नाविन्य पुर्ण विविध उपक्रम राबवा, असे आवाहनही यावेळी सीईओ अजित कुंभार यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!